अखेर सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याऱ्या वकिलावर अवमानाचा खटला चालणार...

नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने वकील राकेश किशोर तिवारी यांनी बूट फेकण्याचा प्रकार केला होता. त्यानंतर राकेश किशोर यांच्यावर कारवाई केली जावी, असा संताप व्यक्त होतं होता आणि अखेर वकील राकेश किशोर तिवारी यांच्याविरोधात अवमानाचा खटला चालवला जाणार आहे.
या प्रकरणी खटला चालवण्याबाबत महाधिवक्ता. आर. वेंकरमनी यांच्याकडे संमती मागितली होती. ती त्यांनी दिली आहे. त्यामुळे वकील राकेश किशोर यांच्यावर दिवाळीच्या सुट्टीनंतर सुनावणी सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.