‘मी माफी मागणार नाही, मला पश्चात्तापही नाही’ : सरन्यायाधीशांकडे बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाची प्रतिक्रिया 

<p>‘मी माफी मागणार नाही, मला पश्चात्तापही नाही’ : सरन्यायाधीशांकडे बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाची प्रतिक्रिया </p>

नवी दिल्ली – काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना  सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारे ७१ वर्षीय वकील राकेश किशोर यांनी, “मी माफी मागणार नाही आणि मला पश्चात्तापही नाही. मी काहीही केलेले नाही. दैवी शक्तीने मला हे करण्यास भाग पाडले.” असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 
वकील राकेश किशोर यांनी, आपला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. मध्य प्रदेशातील खजुराहोच्या जावरी मंदिरात शिरच्छेद केलेल्या भगवान विष्णूच्या मूर्तीच्या जीर्णोद्धाराची मागणी करणाऱ्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी केलेल्या टिप्पण्यांमुळे आपण संतप्त झालो होतो, असा दावा त्यांनी केला आहे.