सार्वजनिक निधीचा वापर पुतळे बांधण्यासाठी...: निधी खर्च करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले ‘हे’ निर्देश...

नवी दिल्ली - सार्वजनिक पैसा हा विकास कामे आणि जनतेच्या कल्याणासाठी वापरला जावा, न की स्मारक किंवा पुतळ्यांसारख्या गोष्टींसाठी, असे म्हणत सुप्रीम कोर्टाने, राज्य सरकारला सार्वजनिक निधीचा वापर पुतळे बांधण्यासाठी न करण्याचे निर्देश एका याचिकेवर सुनावणी करताना दिले आहेत.
कोर्टाने म्हटले आहे की, अनेक राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था मोठ्या प्रमाणात निधी पुतळे बांधण्यावर खर्च करत आहेत, ज्यामुळे सार्वजनिक संसाधनांचा गैरवापर होत आहे. कोर्टाने सरकारला यासंदर्भात जबाबदार धोरण स्वीकारण्यास सांगितले आहे.