वनताराचं काम कायद्यानुसार...: सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं निरीक्षण

<p>वनताराचं काम कायद्यानुसार...: सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं निरीक्षण</p>

नवी दिल्ली – आज सर्वोच्च न्यायालयात गुजरातमधील जामनगर येथील रिलायन्स फाउंडेशन संचलित वनतारामधील प्राण्यांच्या खरेदीबाबत सुनावणी पार पडली. याबाबत एसआयटीने न्यायमूर्ती पंकज मित्तल व पी.बी. वरळे यांच्या खंडपीठासमोर अहवाल सादर केला. यावेळी न्यायालयाने वनताराला किलीन चीट दिले आहे.

यावेळी न्यायालयाने, “वनतारा कायद्याचे पालन करते, त्यामुळे बदनामी करू नका, वनताराचे काम कायद्यानुसार पारदर्शक आहे. वन जीवांसाठी काम करणाऱ्यांसाठी वनतारा आदर्श मॉडेल आहे. इतर राज्य व संघटनांसाठी वनतारा प्रेरणा बनेल”, असे निरीक्षण नोंदवले आहे.  वनताराची स्वतंत्र समितीने संपूर्ण चौकशी करून सादर केलेल्या अहवालावर आम्ही समाधानी आहोत. आता कोणालाही पुन्हा पुन्हा शंका उपस्थित करण्याची परवानगी दिली जाणार नाही.सर्व संबंधित यंत्रणांना या अहवालातील शिफारसींवर आधारित पावले उचलण्याचे स्वातंत्र्य आहे. तुम्हीही त्याचे पालन करणे बंधनकारक आहे, असेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले.