कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीला विक्रमी यश: ४३ कोटींच्या तडजोडी, ४ हजार प्रकरणांचा निकाल
अदालतीला-हेडींग
दुसरा पॅरा . मध्ये पाचवी , सहावी ओळ चेक करा

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवार, १४ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीला पक्षकारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या लोक अदालतीत तब्बल ४,००० हून अधिक प्रकरणे निकाली काढण्यात आली. ४३ कोटी २५ लाख रुपयांची भरपाई तडजोडीने अदा करण्यात आली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारातून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय आणि जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवारी लोक राष्ट्रीय अदालतीचे त्याचे आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश के.बी.अग्रवाल, जिल्हा सत्र न्यायाधीश आर व्ही अदोने, डी.व्ही. कश्यप,एस. एस. तांबे, एस.एस. वाईकर, एस.वाय. देशमुख, एस ए बाफना,एस. एम. गादिया,एस बी देवरे,आय. एम.नायकवडी,पी के अग्निहोत्री बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही.आर.पाटील उपाध्यक्ष टी. एस.पाडेकर विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दिपाली डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी न्याय संकुलाच्या इमारतीत दीप प्रज्वलन करून लोक अदालतीचे उद्घाटन करण्यात आलं.
जिल्ह्यातील लोक आदालतीसाठी ४२ पॅनलच्या माध्यमातून तडजोडीपोटी ४३ कोटी २५ लाख रुपयांची भरपाई पक्षकाराना अदा करण्यात आली. न्यायालयाकडील ९९,८४७ दाखल प्रकरणा पैकी ३९,४७६ प्रकरणं या लोक अदालती मध्ये ठेवण्यात आली होती. तर मोटार अपघात नुकसान भरपाई ची ९० प्रकरणं निकाली काढत ७ कोटी ८८ लाख ४९ हजार रुपये रक्कम मंजूर करण्यात आलीय. ग्रामपंचायत महानगरपालिकेकडील थकीत घरफाळा पाणीपट्टी वसुलीची ९६८ प्रकरण निकाली काढत २ कोटी ९७ लाख रुपये अदा करण्यात आलेत. याशिवाय दिवाणी, फौजदारी कौटुंबिक ,बँकेची थकीत वसुली, पाणीपट्टी ,घरफाळा ,वाहनांवरील दंड अशी एकूण ३८८ प्रकरण निकाली काढत तब्बल एकूण ४३ कोटी २५ लाखांची रुपयांची भरपाई अदा करण्यात आलीय.शनिवारी पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीला जिल्ह्यात पक्षकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.