जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकींबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय 

<p>जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकींबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय </p>

मुंबई – आज सुप्रीम कोर्टात राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींबाबत सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद - पंचायत समितींच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहे. 
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे अधिकचा वेळ मागितला होता. यावर १५ फेब्रुवारी पर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला दिले आहेत.