आ. राजेंद्र पाटील - यड्रावकर यांच्या साखर कारखान्यावर दगडफेक... ग्रामस्थ आक्रमक
कोल्हापूर - हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे येथे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शरद सहकारी साखर कारखान्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. यावेळी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी साखर कारखान्यावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे.
कारखान्याकडून मळी मिश्रित आणि काळे पाणी परिसरातील नदीत सोडण्यात येत असल्याचा आरोप भेंडवडे ग्रामस्थांनी केला आहे. यासाठी शेजारील गावातील ग्रामस्थांनी थेट कारखान्यावर धडक मोर्चा काढत दगडफेक केली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.