गोकुळने दूध उत्पादकांसाठी दिली 'ही' गोड बातमी

गोकुळच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर एक रुपयांची दरवाढ

<p>गोकुळने दूध उत्पादकांसाठी दिली 'ही' गोड बातमी</p>

कोल्हापूर - ग्राहकांवर बोजा न टाकता गोकुळच्या दूध खरेदी दरात गायी आणि म्हैशीसाठी प्रति लिटर एक रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर पशुखाद्य दरात पन्नास रुपयांची कपात आणि संस्थांना देण्यात येणाऱ्या व्यवस्थापन खर्च मार्जिन मध्ये प्रति लिटर 10 पैशांची वाढ देणार असल्याची घोषणा
आज गोकुळचे  ज्येष्ठ संचालक विश्वास  पाटील यांनी केलीय.

गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात वसुबारस कार्यक्रम आणि गोकुळच्या नवीन  उत्पादनाचा विक्री शुभारंभ  वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी गोकुळने दूध उत्पादकांसाठी ही  गोड बातमी दिली आहे.