कंदलगावमधील श्रीराम दूध संस्थेच्यावतीने दूध दर फरक बिलाचे वाटप

कोल्हापूर - करवीर तालुक्यातील कंदलगाव येथील श्री राम सहकारी दूध उत्पादक संस्थेत सभासदांना दूध दर फरक वाटप आणि संस्थेला सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक सभासदांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
सुरुवातीला संस्थेच्यावतीने चेअरमन दगडु रणदिवे यांनी सर्व सभासदांचे स्वागत केले. यानंतर संस्थेचे सचिव गणेश किल्लेदार यांनी संस्थेच्या वार्षिक कामगिरीचा आढावा घेवून दूध उत्पादक सभासदांचे आभार मानले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सभासदांना दूध दर फरक वाटप करण्यात आले. संस्थेला गेल्या वर्षभरात सर्वाधिक म्हैस दूध पुरवठा करणारे चंद्रकांत रणदिवे, यशवंत पाटील, सदाशिव रणदिवे तसेच गाय दूध पुरवठा करणाऱ्या विश्वास रणदिवे, योगेश पाटील, मारुती रणदिवे यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले.
यावेळी व्हॉईस चेअरमन लक्ष्मीबाई जाधव, छाया रणदिवे, श्रीपती खोत, चंद्रकांत रणदिवे, प्रकाश संकपाळ, अंबाजी रणदिवे, विशाल पाटील, संपत गुरव, जमाल कांबळे, मनोहर लोहार यांच्यासह सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते.