गोकुळकडून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना पशुखाद्य, टीएमआर मॅश वाटप...

<p>गोकुळकडून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना पशुखाद्य, टीएमआर मॅश वाटप...</p>

कोल्हापूर - जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाच्यावतीने सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यातील पूरग्रस्त भागांतील शेतकरी आणि  पशुपालकांना महालक्ष्मी पशुखाद्य १० मे.टन व टीएमआर मॅश ८ मे.टनाचे वाटप करण्यात आले.
संघाचे संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, बयाजी शेळके यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्याकडे पशुखाद्य सुपूर्द करण्यात आले. 

यावेळी सैफन नदाफ, रवींद्र मोहिते, डॉ. सत्यजित पाटील व पशुखाद्य मार्केटिंग प्रतिनिधी रवींद्र लाड उपस्थित होते.