गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट..!

कोल्हापूर - प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही म्हैस व गायीच्या अंतिम दूध दर फरकापोटी तब्बल १३६ कोटी ३ लाख रुपयाची उच्चांकी रक्कम थेट प्राथमिक दूध संस्थाच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. हीच गोकुळकडून लाखो दूध उत्पादकांना मिळालेली दिपावली भेट ठरणार असल्याचे माहिती गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी दिली.
गोकुळला पुरवठा केलेल्या म्हैस दूधास सरासरी प्रतिलिटर २ रुपये ४५ पैसे व गाय दूधास सरासरी प्रतिलिटर १ रुपये ४५ पैसे याप्रमाणे दूध संस्थांना अंतिम दूध दर फरक देण्यात येणार आहे. दूध संस्थासाठी प्रतिलिटर सरासरी १ रुपये २५ पैसे प्रमाणे प्राथमिक दूध संस्थांच्या नावावर डिबेंचर्स पोटी गोकुळकडे जमा करण्यात येणार आहेत. दूध उत्पादकांना हीरक महोत्सवी जादा दर फरक म्हैस दुधास प्रतिलिटर २० पैसे व गाय दुधास प्रतिलिटर २० पैसे देण्यात आला आहे व तो वरील दर फरकामध्ये समाविष्ठ आहे.
यावेळी माजी चेअरमन विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बाळासो खाडे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी उपस्थित होते.