भोगावती कारखान्यातील उसाचा रस गटारीतून वाहतोय..?

शेतकरी सेनेचा आरोप 

<p>भोगावती कारखान्यातील उसाचा रस गटारीतून वाहतोय..?</p>

कोल्हापूर - शिवसेना शेतकरी सेनेचे राज्यसचिव जनार्दन पाटील, करवीर तालुका अध्यक्ष विलास पाटील, राधानगरी तालुकाध्यक्ष रंगराव पाटील, शंकरराव झांजगे, नामदेव कारंडे, शामराव टिपुगडे, बाळासाहेब पाटील, वसंतराव पाटील यांनी करवीर तालुक्यातील परिते येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याला भेट दिली.

 या भेटीवेळी कारखान्यातील उसाचा रस गटारीतून जात असल्याचे निदर्शनाला आल्यानंतर त्यांनी त्याचे चित्रीकरण करत कारखाना प्रशासनाचा निषेध केला. यावेळी शेतकरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठक घेऊन कारखाना व्यवस्थापनावर टीका केली.

शेतकरी सेनेने भोगावती कारखान्यातील उसाचा रस गटारीतून वाहतोय या  केलेल्या आरोपांबाबत भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील  यांना विचारले असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही कारखान्याचे असे नुकसान का करू? असा प्रतिसवाल करत चेअरमन पाटील यांनी कारखान्याचा कारभार काटकसरीने आणि पारदर्शक पद्धतीने सुरू असल्याचा दावा केला आहे. कुणीही अविचाराने कारखान्याची बदनामी करू नये, असे आवाहनही चेअरमन पाटील यांनी केले आहे.