उद्योगपती अनिल अंबानी यांना ईडीचा झटका

मुंबई - उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुंबईपासून ते इंदूरपर्यंत कंपनीशी संबंधित सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. अनिल अंबानी यांच्या कंपनीवर परदेशात बेकायदेशीरपणे पैसे पाठवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सक्तवसुली संचालनालय या पूर्वी रिलायन्स इन्फ्रा व अनिल अंबानींशी संबंधित इतर समूह कंपन्यांमधील १७ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीचं कर्ज वळवल्या प्रकरणी तपास करत आहे. मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत चौकशी चालू आहे. त्यात आणखीन सहा ठिकाणी ईडीने छापेमारी केल्याने अनिल अंबानी यांना झटका बसला आहे.