सर्वसामान्यांच्या हितासाठी योग्य नेतृत्व निवडण्याची हीच संधी : कणेरीवाडीतील सभेत ऋतुराज पाटील यांचे वक्तव्य 

<p>सर्वसामान्यांच्या हितासाठी योग्य नेतृत्व निवडण्याची हीच संधी : कणेरीवाडीतील सभेत ऋतुराज पाटील यांचे वक्तव्य </p>

कोल्हापूर – सर्वसामान्यांच्या हितासाठी योग्य नेतृत्व निवडण्याची हीच खरी संधी असल्याचे वक्तव्य माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केले आहे. कणेरीवाडी  येथील प्रचार सभेत ते बोलत होते. 
गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुदर्शन खोत आणि पंचायत समितीचे उमेदवार संदीप पाटील यांच्या प्रचारार्थ कणेरीवाडी येथे संकल्प सभा घेण्यात आली. 
या सभेस जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, कणेरीचे सरपंच निशांत पाटील, गोकुळ शिरगांवचे सरपंच चंद्रकांत डावरे, कणेरीवाडीच्या सरपंच श्यामल कदम, उपसरपंच सीमा खोत, कोल्हापूर महानगपालिकेचे नगरसेवक राजेंद्र लाटकर यांच्यासह सरिता शशिकांत खोत, वैभवी जरग, वेदवती मोहिते, सागर पाटील, शिवाजीराव मोरे पाटील, सदाशिव म्हाकवे, आप्पासो मोरे, एम.बी.पाटील, साताप्पा कांबळे, तानाजी भोसले, विजय मोरे, अरुण मोरे, संभाजी मोरे, शंकरराव पाटील, सर्व आजी - माजी ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.