जनतेची ताकद हीच खरी शक्ती : उंचगांवतील मेळाव्यात ऋतुराज पाटील यांचे प्रतिपादन
कोल्हापूर - समोर कितीही मोठी नेतेमंडळी असली तरी, जनतेची ताकद हीच खरी शक्ती आहे. सर्वसामान्य जनता, विशेषतः माता-भगिनींची ताकद ही काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचा विश्वास माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला.
उंचगांव जिल्हा परिषदेचे उमेदवार कीर्ती मसुटे, संगीता यादव, सुनील पोवार यांच्या प्रचारार्थ उंचगांव येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी अभिनेत्री काव्या (ज्ञानदा) रामतीर्थकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी उंचगांवचे सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच श्रीधर कदम, कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र लाटकर, प्रवीण केसरकर, गांधीनगर सरपंच संदीप पाटोळे, सरनोबतवाडीच्या सरपंच शुभांगी आडसूळ, माजी जिल्हा परिषद सदस्या मंगलताई वळकुंजे, उंचगांवच्या माजी उपसरपंच सुरेखा चौगले यांच्यासह वेदवती मोहिते, वैभवी जरग, शिवानी पाटील, सुनीता चव्हाण, शीला मोरे, सारिका माने, वैजयंती यादव, मयुरा चव्हाण, जाहिदा इनामदार, कीर्ती चौगले, सुरेखा कदम, त्रिशा पाटील, शीतल कदम, शिल्पा कुराडे, सर्व आजी - माजी नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते.