जरगीतील मोटरसायकल रॅलीस युवकांचा भव्य दिव्य प्रतिसाद...
गगनगिरी महाराजांचा आध्यात्मिक वारसा पुढे नेण्यासाठी साथ द्या : आ. सतेज पाटील
गगनबावडा - गगनगिरी महाराजांच्या आशिर्वादाने पावन झालेल्या या परिसरात काँग्रेस पक्षाने त्यांच्या वारसांना उमेदवारी दिली आहे. गगनबावडा तालुक्याचा आध्यात्मिक वारसा पुढे नेण्यासाठी साथ द्या, असे आवाहन आ. सतेज पाटील यांनी मतदारांना केले. गगनबावडा तालुक्यातील जरगीच्या जाहीर सभेत ते बोलत होते.
या जाहीर सभेपूर्वी आ. सतेज पाटील यांनी मतदार संघातील युवकांसोबत भव्य दिव्य अशी मोटरसायकल रॅली काढली. या रॅलीत अनेक युवक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. असळज जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार संभाजी पाटणकर आणि पंचायत समितीचे राजेश पाटील आणि धुंदवडे पंचायत समितीच्या उमेदवार शुभांगी कुंडलिक संकपाळ यांच्या प्रचारार्थ जरगीमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बजरंग पाटील, मानसिंग पाटील, दत्तात्रय पाटील, उदयआप्पा देसाई, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, एम.जी. पाटील, बंडाप्पा पडवळ, अभय बोभाटे, तानाजी कांबळे, अरुण चव्हाण, एस. के. पाटील, अनिता भांबोरे, दत्ताजीराव पाटणकर, प्रकाश पाटील, दत्ता बांदेकर, विक्रम पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रिया वरेकर, माजी सभापती मंगल कांबळे, शालिनी शेळके, तानाजी पाटणकर, सरिता पाटील, जरगी गावच्या सरपंच सुलाबाई आबुस्कर यांच्यासह गगनबावडा तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.