राधानगरीच्या रक्तात काँग्रेस : आमदार सतेज पाटील
कोल्हापूर – राधानगरी तालुका म्हणजे काँग्रेसचा डीएनए असून राधानगरीतील माणसांच्या रक्तात काँग्रेस आहे. राधानगरी तालुका सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा तालुका आहे. पी.एन. पाटील साहेबांनी येथील काँग्रेसचा पाया भक्कम केला असल्याचे वक्तव्य आमदार सतेज पाटील यांनी केले.
राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सागर पांडुरंग धुंदरे, पंचायत समितीच्या उमेदवार अमृता अतुल पाटील आणि धामोड पंचायत समितीचे उमेदवार विलास लहू हळदे यांच्या प्रचारार्थ राशिवडे बुद्रुक येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते
यावेळी येळवडे येथे पांडुरंग पाटील आणि कंथेवाडी येथे माजी आमदार शंकर धोंडी पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रचार सभेत बोलताना काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी भाजप-शिवसेना सत्तेवर जोरदार हल्लाबोल केला.
जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांनी, राधानगरी तालुक्यातील सर्व निवडणुका काँग्रेसच्या झेंड्याखाली लढवाव्यात. ही दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांची इच्छा होती, असं सांगत जिल्हा परिषदेचे पाच आणि पंचायत समितीचे दहा असे काँग्रेसचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणून, या निवडणुकीत इतिहास घडवू, असे आवाहन केले.
प्रचार सभेत भोगावती कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन विश्वनाथ पाटील, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, डॉ. प्रकाश पोवार, अशोक साळोखे यांच्यासह उमेदवारांनीही आपले विचार मांडले. यावेळी सदाशिव चरापले, पी. डी. धुंदरे, अविनाश पाटील, कृष्णराव पाटील, हिंदुराव चौगले, अशोक साळोखे, मोहन धुंदरे, उत्तम पाटील, वैभव तहसीलदार, माजी सरपंच कृष्णात पोवार, रंगराव गुरव, लक्ष्मण गोते यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.