काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी आ. ऋतुराज पाटील यांची चिंचवाड-गांधीनगरमध्ये पदयात्रा...
कोल्हापूर - गडमुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब पाटील, तसंच पंचायत समितीचे उमेदवार निता कांबळे आणि प्रताप चंदवाणी यांच्या प्रचारार्थ माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी चिंचवाड आणि गांधीनगरमध्ये संपर्क दौरा केला.
दौऱ्याची सुरुवात चिंचवाड गावातून करण्यात आली. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला. या प्रसंगी सरपंच श्रद्धा पोतदार, प्रशांत पोतदार, अनिल पाटील, सुरेश पाटील, अशोक पाटील, शुभम खोत, प्रवीण पोतदार, सुकुमार पाटील, शीतल पाटील आणि संतोष पाटील यांनी संपूर्ण गाव काँग्रेस उमेदवारांच्या पाठीशी असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये त्यांना मताधिक्याने निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केला.
त्यानंतर उंचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कीर्तीकुमार मसुटे आणि पंचायत समितीच्या उमेदवार संगीता यादव यांच्या प्रचारार्थ गांधीनगरमधील कोयना कॉलनीमध्ये महिलांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी, काँग्रेस पक्षाने महिलांसाठी राबवलेल्या विविध योजनांची माहिती देत काँग्रेस उमेदवारांना मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे, निवास तामगावे, जहीदा इनामदार, रियाज सनदी, सचिन जोशी, सुरेश लोखंडे, रोहन बुचडे, अमृता सावंत, सुहास यादव, शंकर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर गांधीनगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी सिंधी समाज भवनात झालेल्या बैठकीत माजी आमदार ऋतुराज पाटील आणि नगरसेवक राजेश लाटकर यांनी उपस्थितांशी संवाद साधत काँग्रेसच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मते देऊन निवडून देण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी सिंधी समाजाचे मदन मलानी, सेवाराम तलरेजा, विनोद होजारानी, सोनी तेवलानी, गुड्डू सचदेव, सनी चंदवाणी, प्रकाश तेवलानी, सागर उदासी, कुमार अहुजा, महेश छाब्रिया यांच्यासह गांधीनगरवासिय उपस्थित होते.