बंटी पाटील कच्चा नाही, सच्चा माणूस : आ. सतेज पाटील

बाजारभोगावात पंचायत समितीचे उमेदवार अर्जुन पाटील यांच्या प्रचारार्थ सभा

<p>बंटी पाटील कच्चा नाही, सच्चा माणूस : आ. सतेज पाटील</p>

कोल्हापूर – २०१४ साली सत्ता गेली म्हणून बंटी पाटील पक्ष बदलणाऱ्यांपैकी नाही. या एकाकी लढाईमध्ये माझ्यासोबत जनता आहे. बंटी पाटील कुठला कच्चा नाही, तर सच्चा माणूस असल्याचे वक्तव्य आ. सतेज पाटील यांनी केले. प्रचार सभेत ते बोलत होते.

पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव पंचायत समिती मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अर्जुन कृष्णात पाटील यांच्या प्रचारार्थ भोगाव येथे आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी बी. आर. पाटील होते.

 यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, अर्जुन पाटील हे डमी नाही तर निवडून येणारे उमेदवार आहे. पन्हाळा तालुका काँग्रेसच्या विचारधारेचा तालुका आहे. ज्यावेळी बंटी पाटील डाव टाकतो तो विजयाचा डाव असतो. ज्याप्रमाणे डी. वाय. पाटील दादा, यशवंत एकनाथ पाटील दादा, अरुण नरके तालुक्याच्या विकासासाठी सक्रीय होते त्याच पध्दतीनं आपणही सक्रीय राहणार असून कोणत्याही अडचणीत इथल्या जनतेसोबत आपण असू, अशी ग्वाही त्यांनी दिली. पडसाळी घाटा संदर्भात लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू असे आश्वासनही आमदार सतेज पाटील यांनी दिले.

यावेळी गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांनी, काँग्रेसच्या माध्यमातून पन्हाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला असल्याचे सांगितले. काँग्रेसचे पन्हाळा तालुकाध्यक्ष निवास पाटील यांनी, दुर्गम भागात काँग्रेस पक्षानेच कामी केली असल्याचे सांगितले.

यावेळी सारंग तळेकर, रावसाहेब पाटील, उमेदवार अर्जुन पाटील यांनी मनोगतं व्यक्त केली. यावेळी उपाध्यक्ष पी. डी. पाटील, सुनील पाटील, रमूल पन्हाळकर, राजू महामुलकर, बी.डी. कोटकर, बबन रानगे, युवराज काटकर, रविराज सावंत, राहुल खोत, निलेश पाटील, महादेव महामुलकर, अरविंद बुवा, सदाभाऊ पवार, सुरेश मुगडे, विशाल पाटील, प्रमोद हिरडेकर, विजय माळवी, रवी पाटील आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.