भाजपकडून महापौर पदासाठी ‘यांच्या’ नावाची घोषणा...
कोल्हापूर – कोल्हापूर महापालिका महापौर पदासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेवून रुपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा केली आहे.
कोल्हापुरात कोणत्याही स्थितीत शिवसेना शिंदे गटाचा महापौर झाला पाहिजे, यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी बॅनरबाजी केली होती. त्यामुळे महापौरपदावर कोण बसणार यावर चर्चा रंगली होती. मात्र, आता भाजपकडून रुपाराणी निकम यांना संधी देण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ सव्वा वर्षाचा असणार आहे.
येत्या 6 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभेत महापौर व उपमहापौर यांची निवड केली जाणार आहे.