माझं मन सांगतंय दादा असे जाऊच शकत नाहीत...: आ. अमोल मिटकरींची भावनिक पोस्ट
मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक निधनाने कार्यकर्त्यांसह सर्वांना धक्का बसला आहे. त्यामुळे सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे. परंतु या अपघाती निधनावर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी भावनिक पोस्ट करून ‘देवा तुला कुठं रे शोधायचं’, असे म्हटले आहे.
आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे कि,“माझा विश्वास आहे आणि माझं मन सांगतंय दादा असे जाऊच शकत नाहीत. ज्यांनी कुणी हा देवमाणुस हिरावून नेण्याचं पाप केलं असेल भविष्यात त्यांच्या घरात त्यांची चिता जाळणारा कुणी शिल्लक नसेल”