अजित पवारांच्या अंत्यविधीदरम्यान चोरट्यांनी केला हात साफ...
25 लाखांचे दागिने लंपास
बारामती - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधी दरम्यान धक्कादायक प्रकार घडला आहे. यावेळी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत 15 जणांचे 25 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
या चोरी प्रकरणी पोलिसांनी सहा चोरटयांची धरपकड केली असून त्यांच्या साथीदारांचा शोध सुरु आहे. यावेळी काही चोरटयांना नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
त्या दिवशी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात असताना ही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. इतका मोठा पोलीस फौजफाटा उपस्थित असताना चोरटयांच्या टोळीने हात साफ केल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.