एका पैलवानाने जाब विचारल्यानंतर महापालिका प्रशासनाला आली जाग...

 

खासबाग मैदानातील कचरा, लोखंडी सामान हटवलं

<p>एका पैलवानाने जाब विचारल्यानंतर महापालिका प्रशासनाला आली जाग...</p>

<p> </p>

कोल्हापूर – शहरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी १९१२ साली खासबाग मैदानाची स्थापना केली. कोल्हापुरातल्या पैलवानांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्याचबरोबर येथे  आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल निर्माण व्हावेत, या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली. याच मातीमध्ये अनेक दिग्गज पैलवानांच्या नामांकित कुस्ती स्पर्धा पार पडल्या.

कोल्हापूरकरांचा अभिमान आणि अस्मिता असणाऱ्या या मैदानाची अलीकडे मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. या विरोधात अकरा ऑक्टोबरला पैलवानांनी महापालिका प्रशासनाविरुद्ध दंड थोपटला. यावेळी करण्यात आलेल्या आंदोलनानंतर महापालिका प्रशासनाने याचे काम केले. त्यानंतर चौदा नोव्हेंबरला पुन्हा एकदा या मैदानावर पैलवानांचा शडू घुमला. मात्र पुन्हा मैदानाला दुरवस्थेचे ग्रहण लागले. पैलवान संग्राम कांबळे हे मुंबईत पोलीस खात्यात नोकरीला आहेत. कोल्हापूरला आल्यानंतर ज्या मातीत घडलो त्याला मातीला नमन करायला ते कधी विसरत नाहीत. आज ते खासबाग मैदानात गेल्यानंतर तिथे अनेक दिवसापासून साचलेला कचरा आणि लोखंडी सामान तसंच पडून असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ महापालिका प्रशासनाला याबद्दल जाब विचारला. यावर हडबडून जागी झालेल्या महापालिकेने तात्काळ हा कचरा आणि लोखंडी सामान हटवले. यातून हा प्रश्न निर्माण होतो की, अशा प्रकारचा ऐतिहासिक वारसा जोपासणे हे महानगरपालिकेचे आद्य कर्तव्य आहे. पण या कर्तव्याची जाणीव पैलवानांनी करून द्यावी आणि मग यंत्रणेला जाग यावी, ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे यापुढे तरी महापालिका प्रशासनाने दक्ष राहून वेळच्यावेळी कामे करावीत आणि खासबाग मैदानाचे पावित्र्य जपावे इतकीच माफक अपेक्षा.