काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ ऋतुराज पाटील यांनी गडमुडशिंगी ग्रामस्थांशी साधला संवाद

<p>काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ ऋतुराज पाटील यांनी गडमुडशिंगी ग्रामस्थांशी साधला संवाद</p>

कोल्हापूर -  गडमुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब पाटील आणि पंचायत समितीच्या उमेदवार निता कांबळे यांच्या प्रचारासाठी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी न्यू वाडदे वसाहत आणि गडमुडशिंगी गावात भेटी देत नागरिकांशी संवाद साधला.

सुरवातीला न्यू वडगे वसाहतमधील बैठकीत सरपंच दत्ता पाटील यांनी संपूर्ण गाव काँग्रेस उमेदवारांच्या पाठीशी असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये मताधिक्याने निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी सचिन कुर्ले, पिंटू पाटील, विनायक कुर्ले, अभिजित चव्हाण, सुरेश माने, निलेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

गडमुडशिंगी गावातील मातंग वसाहत, वायदंडे वसाहत आणि वाघुडे वसाहत यासह विविध ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या धोरणांची माहिती देत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊन गावचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन दिले. कोल्हापूरची स्वाभिमानी जनता नेहमी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी राहते. महानगरपालिकेत थोडक्यात हुकलेली संधी जिल्हा परिषदेत द्यावी, असे आवाहन माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केले आहे.

माजी चेअरमन संजय पाटील यांनी, गडमुडशिंगी गावाची मते घेऊन निवडून आलेले विद्यमान आमदार वर्षभरात एकदाही गावात फिरकले नसल्याची टीका केली. गावासाठी एक रुपयाचाही निधी न आणणाऱ्यांना मतदान करू नका, असं आवाहनही त्यांनी केले.

या प्रसंगी माजी चेअरमन संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन पाटील, विठ्ठल पुजारी, उत्तम पाटील, विनोद सोनुले, मयूर सोनुले, कपूर सोनुले, संभाजी दाभाडे, गुंडा वायदंडे, राहुल सूर्यवंशी, संजय सुकटे, दिलीप थोरात, शहाजी दांगट यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.