जिल्ह्यातील तक्रारींचे जलद गतीने निरसन करण्यासाठी पोलीस दलाचा नवा उपक्रम...
80 मोबाईल हँन्डसेट प्रदान
कोल्हापूर – सर्वसामान्य लोकांच्या तक्रारी जलद गतीने सोडवल्या जाव्यात. यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी, जिल्हा पोलीस दलामध्ये नवीन उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे. त्या उपक्रमा अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्यासह सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, सर्व शाखा प्रभारी पोलीस अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय येथील सर्व मंत्रालय शाखा प्रमुखांना जिल्हा नियोजन समितीतून सॅमसंग कंपनीचे ए 17 मॉडेल असे एकूण 80 मोबाईल हँन्डसेट सीमकार्डसह देण्यात आले आहेत.
हे सर्व मोबाईल संबंधीत पोलीस ठाणेमध्ये कायमस्वरुपी राहणार आहेत. संबंधीत प्रभारी अधिकारी यांनी नमुद ठिकाणावरून बदली झाली तरी देखील सदरचे मोबाईल नंबर हे त्याच ठिकाणी कार्यरत राहणार आहेत. नागरिकांना येणाऱ्या अडचणी तसेच त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करायला लागू नये यासाठी ही संकल्पना राबवण्यात आली आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर – 9684005900
पोलीस अधीक्षक कोल्हापूर – 9684005901
अपर पोलीस अधीक्षक कोल्हापूर – 9684005902
अपर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज – 9684005903
पोलीस उपअधिक्षक अर्थिक गुन्हे शाखा कोल्हापूर - 9684005904
पोलीस उप अधीक्षक गृह – 9684005905
उपविभागीय शहर विभाग कोल्हापूर – 9684005906
उपविभागीय करवीर विभाग, कोल्हापूर- 9684005907
उपविभागीय पोलीस अधिकारी शाहुवाडी – 9684005908
उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी - 9684005909
उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर विभाग - 9684005910