महादेवी हत्ती नेणाऱ्यांना मतं मागण्याचा अधिकार नाही : आ. सतेज पाटील

<p>महादेवी हत्ती नेणाऱ्यांना मतं मागण्याचा अधिकार नाही : आ. सतेज पाटील</p>

कोल्हापूर – महादेवी हत्तीणीला नेणाऱ्या पक्षांना नांदणीत येऊन मतं मागण्याचा कोणताच अधिकार नाही, असे वक्तव्य आ. सतेज पाटील यांनी केले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर नांदणी जिल्हा परिषद मतदार संघातील काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना उबाठा आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

या सभेला दत्त सहकार समुहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, महादेवी हत्तीण ही कोल्हापूरची अस्मिता असून ती परत यावी यासाठी राजू शेट्टी आणि आम्ही मिळून लढा सुरू केला असल्याचे सांगितले.

या सभेला जिल्हा परिषदेचे उमेदवार महादेव कोळी, पंचायत समितीचे उमेदवार सचिन पाटील आणि नीलम म्हेत्रे यांच्यासह आप्पासो नाईक, सचिन शिंदे, विश्वजीत कांबळे, मधुकर पाटील, दरगू गावडे, शेखर पाटील, तानाजी वठारे, आप्पासो लडे, युनुस पटेल आणि ग्रामस्थ उपस्थित होते.