लढणाऱ्या माणसाच्या पाठीशी कोल्हापूर उभा राहतो, हे पुन्हा एकदा सिद्ध करा : आ. सतेज पाटील

<p>लढणाऱ्या माणसाच्या पाठीशी कोल्हापूर उभा राहतो, हे पुन्हा एकदा सिद्ध करा : आ. सतेज पाटील</p>

कोल्हापूर - शिरोळ तालुक्यातील दानोळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघांतील काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीच्या उमेदवारांसाठी आज दानोळी येथे प्रचारसभा घेण्यात आली. या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली.

 काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी ही शेतकऱ्यांना घामाचा दर मिळवून देण्यासाठी आणि ऊस दराच्या न्यायासाठी लढणारी आहे. स्मार्ट वीज मीटर आणि वीजदरवाढी विरोधात काँग्रेस आणि शेतकरी संघटना खंबीरपणे संघर्ष करत आहेत. लढणाऱ्या माणसाच्या पाठीशी कोल्हापूर उभा राहतो, हे पुन्हा सिद्ध करण्यासाठी आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन आ. सतेज पाटील यांनी केले आहे.

यावेळी माजी सभापती सुजाता शिंदे, काँग्रेस तालुकाध्यक्ष दरगू गावडे, माजी सभापती शुभांगी शिंदे, नगरसेवक सचिन शिंदे, राम शिंदे, बंडा शिंदे, वृषभ पाटील, वरूण पाटील, शेखर पाटील, भीमगंगा बोरगावे, राजगोंडा पाटील, सुदर्शन कदम, प्रकाश पाटील, जयदीप थोरात यांच्यासह जिल्हा परिषदेच्या उमेदवार नंदिनी कांबळे, पंचायत समितीच्या उमेदवार दिपाली सुनिल होगळे आणि ज्योती शरद कांबळे तसेच नागरिक उपस्थित होते.