शुभम सादळे खून प्रकरणी तीन आरोपींना अटक...
४ दिवसांची पोलीस कोठडी…
इचलकरंजी - शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अवघ्या पंधरा दिवसांत परिसरात तब्बल तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
रांगोळी गावातील काळम्मावाडी वसाहत परिसरातील स्मशानभूमीजवळ शुभम सादळे याचा तिघांनी धारधार शस्त्राने वार करून खून केला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दर्शन कांबळे, सागर माने आणि प्रथमेश कांबळे या तिघांना अटक केली आहे. या सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.