जिल्हा परिषद - पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रचाराबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय...

२२ सभा रद्द 

<p>जिल्हा परिषद - पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रचाराबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय...</p>

मुंबई -  अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींच्या प्रचाराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यात २२ प्रचार सभा घेणार असल्याचे नियोजन होते. परंतु अचानक अजित पवार यांचे निधन झाल्याने मुख्यमंत्र्यांनी या सभा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. 7 दिवसांत 22 प्रचारसभा होणार होत्या.  परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकही सभा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सर्व सभा रद्द झाल्या आहेत.