‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या घराबाहेर गोळीबार... 

<p>‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या घराबाहेर गोळीबार... </p>

मुंबई – काल मध्यरात्री प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. सध्या जुहू पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून  सीसीटीव्हीच्या माध्यमातून अधिक तपास केला जात आहे.
या घटनेची गंभीरता ओळखून मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास सोपवला आहे. गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेकडून 12 विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.