उपमुख्यमंत्री सुमित्रा पवारांच्या खासदारकीच्या जागेवर ‘यांना’ मिळणार संधी..?
नवी दिल्ली – काल शनिवार सुमित्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे त्यांना आपल्या खासदारकीच्या पदावर राहता येणार नाही. त्यांच्या पदावर पार्थ पवार कि अन्य कोणाला राज्यसभेची खासदारकी द्यायची यावर चर्चा सुरु असून पार्थ पवारांच्या नावावर भाजप अनुकूल नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सुमित्रा पवारांच्या जागी जय पवार यांना राज्यसभेवर खासदारकी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.