कोल्हापूर–गारगोटी मार्गावर अपघात; माजी आमदार ऋतुराज पाटील यांची माणुसकी

<p>कोल्हापूर–गारगोटी मार्गावर अपघात; माजी आमदार ऋतुराज पाटील यांची माणुसकी</p>

आज सकाळी कोल्हापूर–गारगोटी मार्गावर इस्पुर्ली जवळ माजी आमदार ऋतुराज पाटील हे प्रचार दौऱ्यासाठी जात असताना अचानक रस्त्यावर माकड आडवे आल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार दिग्विजय केणे हा युवक किरकोळ जखमी झाला असून माकड देखील गंभीर जखमी झाले आहे. अपघातानंतर माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी तत्काळ आपली गाडी बाजूला उभी करून जखमी दिग्विजय केणे याची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या माकडालाही पाणी पाजत मदत केली. त्यांच्या या कृतीमुळे उपस्थितांनी त्यांच्या माणुसकीचे कौतुक केले.