उद्या थॅलेसेमिया रूग्णांसाठी मोफत HLA तपासणी शिबीराचे आयोजन

<p>उद्या थॅलेसेमिया रूग्णांसाठी मोफत HLA तपासणी शिबीराचे आयोजन</p>

कोल्हापूर – फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशन संस्थेच्यावतीने उद्या थॅलेसेमिया रूग्णांसाठी मोफत HLA तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी पार्क येथील मुख्याध्यापक संघ हॉलमध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत ही तपासणी होणार आहे.
HLA शिबीरासाठी संभाजी नगर, अहिल्या नगर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातील 30 रूग्ण येणार आहेत. तसेच या शिबीरात डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या वतीने Endocrine evaluation  ही तपासणी सुध्दा मोफत केली जाणार आहे.