...त्या शाळांची मान्यता रद्द करा 

सुप्रीम कोर्टाचे शाळांमधील स्वच्छतागृहांबाबत महत्वाचे निर्देश 

<p>...त्या शाळांची मान्यता रद्द करा </p>

नवी दिल्ली – आज सुप्रीम कोर्टाने देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांमधील मुला आणि मुलींच्या स्वतंत्र स्वच्छतागृहांबाबत महत्वाचे निर्देश नोंदवले आहे.
 
मुला आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधली पाहिजेत. ज्या शाळांनी असे केले नाही त्यांची मान्यता रद्द करावी लागेल, असे कठोर निर्देश कोर्टाने दिले आहेत. 
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रत्येक शाळेत अपंगांसाठी अनुकूल शौचालये बांधायला हवेत. तसेच मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटणे बंधनकारक करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारच्या मासिक पाळी स्वच्छता धोरणाची देशभर अंमलबजावणी करण्याची मागणी करणाऱ्या जया ठाकूर यांच्या जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी कोर्टाने हे निर्देश नोंदवले आहे.