टोपमध्ये उमेदवाराच्या प्रचार पत्रकावर भानामतीचा प्रकार...

<p>टोपमध्ये उमेदवाराच्या प्रचार पत्रकावर भानामतीचा प्रकार...</p>

कोल्हापूर - जिल्हयात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. उमेदवार विविध पातळ्यांवर प्रचार यंत्रणा राबवत आहेत. अशातच हातकणंगले तालुक्यातील टोप मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कासारवाडी फाटा ते जोतिबा रस्त्यावर काँग्रेस आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार पत्रकावर भाकरी, मसालेभात, तंबाखू, सिगारेट, लिंबू अशा वस्तू ठेवत भानामती करण्यात आल्याचा प्रकार निदर्शनाला आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकाराचा निषेध केला आहे.