शहापुरात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट... एक जण गंभीर जखमी

<p>शहापुरात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट... एक जण गंभीर जखमी</p>

इचलकरंजी - शहापूर मधील अवधूतनगर परिसरातील भूपाल कोष्टी यांच्या घरात राम यादव हे गेल्या काही वर्षापासून भाडेकरु म्हणून राहत आहेत. आज सकाळी त्यांनी जेवण करण्यासाठी घरगुती गॅस पेटवल्यानंतर सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, घराचे पत्रे उडून गेले तर यादव गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटामुळे शेजारील घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. गंभीर जखमी झालेल्या यादव यांना इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला आहे.