राजकीय घडामोडींना वेग 

 मंत्री छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा 

<p>राजकीय घडामोडींना वेग </p>

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाची जबाबदारी कोणाकडे असणार यावर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यासाठी मंत्री छगन भुजबळ, सुनील तटकरे, खा. प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली आहे. यावेळी त्यांची सव्वातास बैठक चालली. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 
अजित पवारांकडे असणारी अर्थ, क्रीडा  आणि युवक कल्याण मंत्रालय ही खाती राष्ट्रवादीकडेच रहावीत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सध्या कार्याध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात यावी, उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात यावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आला आहे.