धक्कादायक : 'दादां'च्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने कट्टर समर्थकाला हृदयविकाराचा झटका
नाशिक - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वांना धक्का बसला आहे. हा धक्का त्यांच्या कट्टर समर्थकाला सहन न झाल्याने त्यांचा त्यात मृत्यू झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावचे सुदाम बोडके असे त्यांचे नाव आहे. अजित पवार यांचे अत्यंत निष्ठावान समर्थक म्हणून ते ओळखले जात होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकताच सुदाम बोडके यांना मानसिक धक्का बसला. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे अस्वस्थता जाणवू लागली. कुटुंबियांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या धक्क्यामुळे त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांच्या उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. अजितदादा हे केवळ त्यांचे नेते नव्हते, तर सुदाम बोडके यांची त्यांच्यावर अतूट श्रद्धा होती. ही बातमी त्यांच्या पचनी पडली नाही, त्यांना धक्का बसल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.