...यावर डाव खेळत असाल तर हे अमानुष आहे : खा. संजय राऊतांनी नेत्यांचे टोचले कान 

<p>...यावर डाव खेळत असाल तर हे अमानुष आहे : खा. संजय राऊतांनी नेत्यांचे टोचले कान </p>

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राज्यासह पवार कुटुंबिय अद्याप सावरले नाही. असे असताना अजित पवार यांचे उपमुख्यमंत्री पद त्यांची पत्नी खा. सुमित्रा पवार यांना देण्यात यावे. या राजकीय चर्चेला उधाण आले आहे. यावर खा. संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे कि, अजित पवारांच्या पार्थिवाला कालच अग्नि दिला, त्यांच्या जाण्याच्या धक्क्यातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही. तरी कोणी त्यांच्या नावानं राजकारण करत असेल तर ते चुकीचं आहे. तळागाळाचे कार्यकर्तेसुद्धा रडत होते अशा स्थितीत किमान पुढील 15 ते 20 दिवस राजकीय चर्चा करणं सर्वस्वी अमानुष आहे. पवार कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू आणि हुंदके होते. राजकारणाचा विचार आता नको असं म्हणत माध्यमांनीही अशा विषयांना फाटे फोडू नये. या विषयावर आता बोलणं योग्य नसून, कोणी या विषयावर बोललं असेल तर ते माणुसकीशुन्य आहेत. मग ते मंत्री असो किंवा आमदार असो. त्या बाईने पती गमावला, कुटुंबाने कर्ता पुरुष गमावलाय, त्यांच्या डोळ्यात अजून अश्रूधारा आहेत आणि त्यावर आता तुम्ही कोण नेतृत्त्वं करणार यावर डाव खेळत असाल तर हे अमानुष आहे. यावर मी बोलणार नाही' असं म्हणत सगळं स्थिरस्थावर झाल्याशिवाय चर्चा नको असं म्हणत त्यांनी नेत्यांचेही कान टोचले आहेत.