राजारामपुरी स्पोर्ट्स ट्रस्टतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिर

<p>राजारामपुरी स्पोर्ट्स ट्रस्टतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिर</p>

कोल्हापूर : राजारामपुरी स्पोर्ट्स ट्रस्ट, राजारामपुरी तिसरी गल्ली, कोल्हापूर यांच्यावतीने २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरामध्ये तब्बल २४४ पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांचा आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास नगरसेवक संजय मोहिते, प्रज्ञा उत्तुरे, रोहित कवाळे, सृष्टी जाधव, उद्योगपती प्रशांत पोकळे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य संजय पवार, करण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी राजारामपुरी स्पोर्ट्स ट्रस्ट, राजारामपुरी तिसरी गल्ली येथील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदानासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे तसेच वैभवीलक्ष्मी ब्लड बँक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर यांच्या सहकार्याबद्दल मंडळाच्या वतीन आभार मानण्यात आले.