परदेशातही झाला मोठा विमान अपघात... खासदारासह १५ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली – काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला यामध्ये एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशासह राज्यावर शोककळा पसरली होती तर दुसरीकडे परदेशातही मोठा विमान अपघात झाला आहे. या अपघातात खासदारासह १५ जणांचा मृत्यू झाला आहे.
अपघात झालेल्या विमानात कोलंबियन संसदेचे सदस्य डायोजेनेस क्विंटेरो हे होते. ‘विमान अपघात झाल्यानंतर त्या विमानातील प्रवाशांपैकी दुर्दैवाने कोणीही वाचलं नाही.’ असे कोलंबियन मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
कॅमिलो डाझा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांमध्येच या विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि त्यानंतर ही घटना घडली. अपघात घडला तेव्हा विमानात १३ प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स होते. सध्या या विमान अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.