पान भर जाहिराती दिल्या...त्याने काय होणार...७० हजार कोटींचे आरोप मागे घ्या हीच...: खा. संजय राऊत
मुंबई – आज बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवारांना आदरांजली वाहण्यासाठी भाजपकडून आजच्या सर्व दैनिकांमध्ये भली मोठी जाहिरात देण्यात आली आहे. यावर खा. संजय राऊत यांनी फेसबुक पोस्ट करून भाजपवर हल्लाबोल केला आहे.
खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे कि, “भाजपने कमाल केली..! दादाना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पान भर जाहिराती दिल्या..! त्याने काय होणार ? अजित दादांवर भाजपा म्हणजेच पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ७० हजार कोटींचे आरोप मागे घेणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल.