मेनोपॉज क्लिनिक सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य... 

महिलांच्या आयुष्यातील संवेदनशील टप्पा : राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

<p>मेनोपॉज क्लिनिक सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य... </p>

मुंबई – महिलांच्या आयुष्यातील अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि संवेदनशील टप्पात शारीरिक बदल, मानसिक ताण, हॉर्मोनल असंतुलन, हाडांचे आजार, झोपेचे विकार व नैराश्य याकडे दुर्लक्ष होत आहे. हीच गरज ओळखून शासनाने महिलांसाठी ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.
देशात प्रथमच अशा प्रकारचे मेनोपॉज क्लिनिक सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, या क्लिनिकच्या माध्यमातून, तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला, मानसिक आरोग्य समुपदेशन, हाडे, हृदय व हॉर्मोन तपासणी, औषधोपचार व मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. महिलांच्या आरोग्यासाठी राज्य शासनाने टाकलेले हे पाऊल इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
राज्यभरातील महिलांकडून या उपक्रमाला मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.