पाचगावात जि. प आणि पं. समितीच्या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅलीला प्रतिसाद...
कोल्हापूर - पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संग्राम पाटील आणि पंचायत समितीच्या उमेदवार सीमा पोवाळकर यांच्या प्रचारार्थ आज माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचगाव परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली.
या प्रचार फेरीत माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला. रॅलीत ध्वज घेवून , गळ्यात काँग्रेसचे स्कार्फ घालून ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सरपंच प्रियांका पाटील, उपसरपंच संग्राम पोवाळकर, कोअर कमिटी सदस्य नारायण गाडगीळ, जिल्हा बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, कमर्शियल बँकेचे संचालक युवराज गवळी, ग्रामपंचायत सदस्य अभिजीत पौंडकर, सचिन पाटील, रोमा नलवडे, अश्विनी चिले, पौर्णिमा कांबळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते.