अखेर विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला...
बारामती – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा विमान अपघातात मूत्यू झाला आहे. अपघातानंतर अवघ्या २४ तासांत तपास पथकाने अपघातग्रस्त विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' शोधून काढला आहे.
या ब्लॅक बॉक्समुळे अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. दिल्लीच्या व्हीएसआर एव्हिएशन कंपनीच्या 'लर्नजेट ४५' या विमानाचा ब्लॅक बॉक्स घटनास्थळावरून जप्त करण्यात आला आहे. डीजीसीए आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने अपघातस्थळाची पाहणी केली असून विमानाचे इंजिन, पंखे आणि इतर अवशेषांची तपासणी करून नमुने गोळा करण्यात आले आहेत. ब्लॅक बॉक्समधील डेटा आता विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे ज्यामुळे तांत्रिक बिघाड की मानवी चूक, हे स्पष्ट होणार आहे.