उपमुख्यमंत्री अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक दिग्गजांची उपस्थिती...
बारामती - उपमुख्यमंत्री अजित पवारांन अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय बारामतीत दाखल झाला आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, खा. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री छगन भुजबळ, राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, खा. शाहू महाराज यांच्यासह अनेक दिग्गज नेते अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीमध्ये दाखल झाले आहेत.