उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातावर केंद्र सरकारचं स्प्ष्टीकरण...
नवी दिल्ली - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. यावर केंद्र सरकारने एका निवेदनाव्दारे स्पष्टीकरण दिले आहे. या अपघातापूर्वी नेमके काय घडले, याची सविस्तर माहिती सरकारने प्रसिद्ध केले आहे.
विमानाचा पहिला संपर्क झाल्यापासून ते विमान कोसळण्यापर्यंतच्या घटनाक्रमाचा थरार या निवेदनातून सांगितला आहे. बुधवारी सकाळी बारामतीमधील धावपट्टीवर विमानाने उतरण्याचा पहिला प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. त्यानंतर सकाळी ८:४३ वाजता एअर ट्रॅफिक कंट्रोलने (ATC) धावपट्टी क्रमांक ११ वर उतरण्यासाठी परवानगी दिली होती. नियमानुसार वैमानिकाकडून या सूचनेस प्रतिसाद मिळणे आवश्यक होते, मात्र तसे झाले नाही. अवघ्या एका मिनिटात, म्हणजेच ८:४४ वाजता एटीसीला विमानाला लागलेल्या आगीच्या ज्वाळा दिसल्या.
विमान कोसळण्यापूर्वी वैमानिकाने कोणताही 'मे-डे' (MAYDAY) कॉल किंवा कोणत्याही प्रकारची धोक्याची सूचना एटीसीला दिली नव्हती. दरम्यान, 'विमान अपघात तपास ब्युरो'ने (AAIB) या प्रकरणाचा तपास हाती घेतला असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. प्राथमिक माहितीनुसार, दाट धुके आणि कमी दृश्यमानता हे या अपघाताचे मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे.