विमान अपघाता ठिकाणी फॉरेन्सिक टीम दाखल... 

ब्युरोच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु 

<p>विमान अपघाता ठिकाणी फॉरेन्सिक टीम दाखल... </p>

बारामती – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात झालेल्या निधनामुळे राज्यात शोककळा पसरली आहे. या झालेल्या अपघाताची चौकशी व्हावी, अशी मागणी  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेकांनी केली होती. त्या अनुषंगाने चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार बारामतीत विमान अपघाताच्या  ठिकाणी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे.
विमान अपघात तपास ब्युरोचे अधिकारी व्हीआरएस व्हेंचर्स कंपनीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत. कंपनीचे मालक आणि एआयबीचे अधिकारी तब्बल दीड तासांहून अधिक काळ कंपनीच्या आत उपस्थित होते. चौकशी पूर्ण करून ब्युरोचे अधिकारी कंपनीबाहेर आले असून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे ताब्यात घेऊन सील करण्यात आली आहेत.  या चौकशीसाठी तीनहून अधिक अधिकारी VRS व्हेंचर्स कंपनीत पोहोचले होते.