शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू संगीत रजनी कार्यक्रम स्थगित
कोल्हापूर - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्र शासनाने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेला राजर्षी शाहू संगीत रजनी कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. अशी माहिती अधिविभाग प्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी दिली आहे.