उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू... विमान वाहतूक महासंचालनालयाची माहिती
बारामती - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आहे. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिली आहे.
अजित पवार हे विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये आले होते. मात्र विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाला आहे. या घटनेत दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. मात्र अपघात इतका भीषण होता की, त्यात सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.